शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – यंदा २२७१ कोटी खरीप पीक कर्ज वाटपाचा टप्पा पार

पीककर्ज

नाशिक – यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल २२७१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, गत वर्षीच्या तुलनेत ६५८ कोटी रुपये अधिक पीककर्ज वाटण्यात आले आहे. कोरोनामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या कर्जपुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेऊन तब्बल दीड महिन्यापासून विविध प्रयत्न केल्याने यंदा अनेक वर्षांनंतर प्रथमच दोन हजार २७१ कोटी रुपयांचा टप्पा पार झाला आहे.

आव्हानात्मक परिस्थितीत खरीप पीक कर्जाचे वितरण तालुकास्तरावर बैठका घेण्याचे निर्देश देत प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला गेला आहे. अशाही स्थितीत काही खासगी बँकांनी दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यानंतर थेट बँकांच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार करीत स्थानिकांच्या कामकाजात सुधारणा करण्याचे सुचविले आहे. जिल्हा बँकेला वेळोवेळी पत्रव्यवहार करीत, उद्दिष्टवाढीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांशी नियमित बैठका घेत आव्हानात्मक परिस्थितीत खरीप पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.

जिल्हा बँकेची २२१ कोटींपर्यंत मजलपालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पीक कर्ज वितरणासाठी आढावा घेतला. जिल्हाधिकारी स्वतः दर आठवड्याला बैठक घेत असल्याने या संपूर्ण कामात सातत्य राहिले. जिल्हा बँकेने आपले उद्दिष्टापेक्षाही जास्त कर्ज वितरण केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूबीआय बँकांनी खूप लक्ष केंद्रित केले होते. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये सुरवातीला खूप मागे असलेल्या जिल्हा बँकेने २२१ कोटींपर्यंत मजल मारली.

१७ टक्के अधिक कर्जखरीप पीक कर्ज वितरणाचे गेल्या वर्षी तीन हजार १४७ कोटी उद्दिष्ट होते आणि कर्ज वाटप एक हजार ६२३ कोटी इतके झाले होते. या वर्षी ती हजार ३०० एवढे उद्दिष्ट असून, कर्ज वितरण दोन हजार २७१ कोटी इतके झाले आहे. वाढीव उद्दिष्ट असून व परिस्थिती प्रतिकूल असूनही गेल्या वर्षीपेक्षा १७ टक्के अधिक कर्ज वितरण झाले आहे. या कर्ज वितरणात एनडीसीसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगल्या प्रकारे कर्ज वितरण केले आहे. तर एनडीसीसी, बँक ऑफ इंडिया व युनाटेड बँक ऑफ इंडियाने आपल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वितरण केले आहे.

महत्वाच्या बातम्या –