मोठी बातमी: आयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता

संजय धोत्रे

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे हस्ते लोकार्पण

अकोला – कोविड रुग्णाची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली असून त्यांना भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. या कोविड किट्सचे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला येथून ऑनलाईन केले.

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

संजय धोत्रे याबद्दलची माहिती देताना म्हणाले, कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची कोविड चाचणी व तपासणी हेाणे गरजेचे आहे. यासाठी आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कोविड किट तयार केली असुन याची किंमत फक्त ३९९ रुपये आहे. याला लागणारा इतर खर्च मिळुन या किटची किंमत फक्त ६५० रुपये होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोविड टेस्ट होऊन कोविडच्या संक्रमणाच्या फैलवावर प्रतिबंध होऊ शकतो असे सांगून श्री. धोत्रे पुढे म्हणाले, यासाठी कोरोश्योर या कंपनीसह सहा कंपनींनी लायसन्स घेतले असुन या कंपनींनी १ लाख किट्सच्या मागे पाच हजार किट्स शासनाला मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट निर्धारित वेळेत तयार झाली असुन हे एक क्रांतीकारी काम असल्याचे त्यांनी सांगुन सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येऊन आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करुन घ्याव्या असे आवाहनही श्री. धोत्रे यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या –

पाच तालुक्यातील ३१ गावात संचारबंदी

तुळशीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?