मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोदी सरकार ने घेतला ‘हा’ र्निणय !

मोदी सरकार

दिल्ली – मोदी सरकारने(Modi government) केंद्रीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी मोठा निर्णय(Big decision) घेतला आहे, कौटुंबिक निवृत्ती वेतनाचा नियम शिथिल केला असून सदरील माहिती हि केंद्रीय मंत्री(Union Minister) जितेंद्र सिंह यांनी दिली.

बघुयात काय आहेत नवीन नियम (New Rules) –
नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये असलेले सरकारी कर्मचारी(Government employees) सेवेदरम्यान बेपत्ता झाल्यास, त्यांच्या कुंटुंबाला ताबडतोब कुटुंब निवृत्तिवेतनाचे फायदे दिले जातील, परंतु कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाल्यास सदरील रक्कम हि पगाराद्वारे कापली जाईल असे स्पष्ट केले आहे. ह्या आधी कर्मचारी बेपत्ता झाल्यास ७ वर्षे होईपर्यंत कौटुंबिक निवृत्ती वेतन देता येत नव्हते परंतु केंद्र सरकारच्या ह्या आदेशामुळे वेळ वाया न जाता ताबडतोब हि प्रकिया पूर्ण करण्यात येणार आहे.
केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने निवेदन जारी केले त्यात हि माहिती देण्यात आली.

नक्षलवादी, दहशतवादी(Terrorist Area) भाग तसेच जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी सेवा करणाऱ्या कुटुंबासाठी नक्कीच हा निर्णय दिलासादायी ठरेल.

महत्वाच्या बातम्या –