‘या’ योजनेंतर्गत मिळणार ५० हजार रुपये, जाणून घ्या नेमकी काय आहे योजना?  

अर्थसंकल्प

दिल्ली :  केंद्र सरकार जनतेला आर्थिक सहाय्य म्हणून वेगवेगळ्या योजना राबवत असते. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी आता एक दिलासदायक बातमी समोर येत आहे. सरकारच्या पीएम ‘स्वनिधी’ योजनेंतर्गत व्यवसायिक दुकानदारांना मदत करण्याचा निणर्य घेण्यात आला आहे. कोरोना काळामध्ये अनेक लोकांचे रोजगार गेले, व्यवसायाचे नुकसान झाले. अशा लोकांना आर्थिक सहाय्य म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत सरकार आता ५० हजार रुपयापर्यंत भांडवल देणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज केल्यास तुम्हाला १० हजार रुपये भांडवल कर्ज म्हणून देण्यात येईल. नंतर जर कर्जाची वेळेत परतफेड केली तर  तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये २० हजार आणि शेवटी तिसऱ्या टप्प्यामध्ये ५० हजार कर्ज मिळेल.

योजनेचे लाभार्थी –

या योजनेचा लाभ फळविक्रेते, वडापावची गाडी, छोटे कपड्याचे दुकान, भाजीविक्रेते अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय असलेल्या दुकानदारांना मिळणार आहे. व्यवसायिक नागरिकांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आर्ज भरावा.