दिल्ली – केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी(Central Government) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकार(Central Government) आता लवकरच मोठं गिफ्ट देणार आहे कारण आता जे केंद्रीय कर्मचारी(Central staff) आहेत त्यांना महागाई भत्यात घसघशीत वाढ होणार असल्याचे समजते.
कोरोना महामारीमुळे माघील ३० जून २०२१ पर्यंत अर्थ मंत्रालयाने महागाई भत्यात वाढ केली नाही त्यामुळे मोदी सरकार (केंद्र सरकारने) जुलै २०२१ मध्ये महागाई भात्यात वाढ केली ती वाढ २८ टक्के एवढी करण्यात आली होती. त्यांनतर २०२१ ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा सरकारने भत्ता वाढवून ३१ टक्के करण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा ३ टक्के वाढ होण्याचे सांगितले जात असून आता महागाई भत्ता हा ३४ टक्क्यांनी वाढणार असल्याचे समजते.त्यासोबत घरभाडे भत्ते दिले जातात त्यात हि वाढ केली जाणार असे समजते.
जाणून घ्या कधी पासून मिळणार महागाई भत्ता ?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना(Central staff) ३१ टक्के एवढा भत्ता मिळतो. सातवा वेतन आयोगाच्या शिफारीनुसार मूळ पगारावर महागाई भत्ता दिला जातो. तसेच २०२२ जानेवारी महिन्यापासून ३ टक्के महागाई भत्ता होणार आहे व त्याची अंमलबजावणी मार्च नंतर केली जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 2 फेब्रुवारी २०२२
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदप
- विड्याचे पानाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- ऊस गाळपासह साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर