मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

गारपीटी

औरंगाबाद – परिसरात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मक्का आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. बुधवारी दुपार नंतर वातावरणात अचानक बदल जाणवायला सुरूवात झाली होती. सायंकाळी लाडसावंगी आणि परिसरात अचानक गारा पडल्या. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका आंबा, डाळिंब, मोसंबी आदी फळांनाही बसलाय. ऐन बहरात असलेल्या आंब्याचा मोहर यामुळे गळून पडला आहे.

मराठवड्यात अनेक शेतकरी मोसंबी आणि डाळिंब या फळांची लागवड करतात. डाळिंबाला सध्या फुले लागलेली होती. मात्र, अचानक झालेल्या या गारपीटीमुळे डाळिंबाची फुले पडली आहे. आधीच अवकाळी नंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. त्यानंतर महावितरण वीज कनेक्शन कट करण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त होते. त्यात आता या गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले असून याचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आलीय.

महत्वाच्या बातम्या –