मोठी बातमी – पुढील २ ते ३ दिवसात ‘या’ शहरात मुसळधार पाऊस !

दिवसात

पुणे – नुकताच पूर्व मॉन्सून पाऊस(Rain) महाराष्ट्रातील काही भागात बरसला आहे, तसेच भारतातील वातावरणात(Atmosphere) मोठे बदल होताना दिसत आहेत. माघील आठवड्यात पूर्व मॉन्सून पाऊस(Rain) पश्चिम महाराष्ट्रात धो – धो बरसला त्याचा फटका सातारा सांगली कोल्हापूर भागांना बसला. तर काहींना उष्णेतून दिलासा मिळाला.

पुन्हा एकदा होणार पाऊस(Rain) !
पुढील ३ – ४ दिवसात मॉन्सून पूर्व पाऊस(Rain) हजेरी लावणार असून पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकण मधील अनेक जिल्ह्यात पाऊस कोसळणार आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) प्रसिद्ध केली आहे. चार दिवसात कोकणात व विदर्भात जोरदार पाऊस(Rain) पडेल असे सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे कि ‘राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते अरबी समुद्राच्या उत्तर पूर्व भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे मॉन्सून पूर्व पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मॉन्सून दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात उशिरा दाखल होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

मॉन्सून चे आगमन होणार असून शेतकऱ्यांनी आपली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. जेणेकरून आर्थिक फटका बसणार नाही, मॉन्सून ची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना वाट बघावी लागणार आहे ६ जून रोजी मॉन्सून तळकोकण गाठेल असे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –