नाशिक येथे सुरू असलेल्या नवव्या जागतिक कृषी महोत्सवाच्या निमत्त ‘कमी पाण्याची व कमी खर्चाची शेती’ या विषयावर मिओरा यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला मिओरा म्हणाले, शेती करताना जैवसाखळी जपली जावी. याबाबत सविस्तर ज्ञान मिळवून त्यानुसार उपाययोजना करण्यात याव्यात.
पुण्यात अजित पवारांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन
शेतीसाठी मधमाशी, फुलपाखरे, साप, गांडूळ, मुंगूस, पशुपक्षी हे सर्व महत्त्वाचे आहे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये काही उणिवा आहेत, ज्यामुळे पीक रोगांना लवकर बळी पडते. रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. शेतकरी उत्पादन घेतो, त्याचे आगामी काळात ब्रँडिंग व पॅकिंग करणेदेखील महत्त्वाचे आहे.म्हणून शेतकऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
71 व्या प्रजासत्ताक दिना निमत्त गुगलचे खास डुडल
शेती महाविद्यालये व विद्यापीठातून शेतीचे ज्ञान घेऊन शेती विकसित करणारे विद्यार्थी मोजकेच आहेत. सर्वांना नोकरीमध्ये जास्त रस असतो म्हणून विद्यापीठांनी यावर गांभीर्यपूर्वक विचार करून अभ्यासक्रम व प्रात्यक्षिके ठरविणे महत्त्वाचे आहे, असेही मिओरा यांनी सांगितले.
71 व्या प्रजासत्ताक दिना निमत्त गुगलचे खास डुडल https://t.co/MdA3OfRokK
— Krushi Nama (@krushinama) January 26, 2020