fbpx

सरकारला जनता जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही: धनंजय मुंडे

अहमदनगर: विरोधी पक्षात असताना उसाचा हमीभाव ३४०० रुपये मागणारे आजचे सत्ताधारी मात्र आज ३१०० रुपये मागणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून गोळ्या झाडत आहे त्यामुळे सध्याचे भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे .
आज नगर जिल्ह्यातील शेवगाव मध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराचा धनंजय मुंडे यांनी निषेध केला . नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे त्याचबरोबर या सरकारला जनता जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही असं देखील मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उस आंदोलन अजून पेटेल पण उसाच्या विषयांवरून राजकारण तापणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे.

Add Comment

Click here to post a comment