‘भाजपा सरकार शेतक-यांपाठोपाठ शिक्षकांच्याही मृत्युचे धनी’

नानाभाऊ पटोले

भाजपा सरकारने आश्वासन न पाळल्यामुळे राज्यभरातील विनाअनुदानीत शाळेतील शिक्षक अडचणीत आले आहे. त्यांना पगार मिळत नसल्यामुळे हजारो शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन शिक्षकांनी आपला प्राण सोडला. ही परिस्थिती पाहता भाजपा सरकार शेतक-यांपाठोपाठ शिक्षकांच्या मृत्यूचे धनी झाल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नानाभाऊ पटोले यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून विनाअनुदानीत शाळेचे हजारो शिक्षक प्रचलित नियमानुसार अनुदान मिळण्यासाठी आंदोलन करीत आहे. सन 2014 च्या निवडणुकीपुर्वी भाजपाच्या नेत्यांनी या शिक्षकांना 100 टक्के अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेऊन सर्व विनाअनुदानीत शाळेचे शिक्षक भक्कमपणे भाजपाच्या पाठीशी उभे राहीले. मात्र पाच वर्ष पुर्ण झाले तरीही या शिक्षकांच्या मागण्या सरकारने पुर्ण केल्या नाही. अनेक वर्ष आंदोलन करुनही न्याय न मिळाल्याने गोंदीया जिल्हयातील केशव गोबडे तसेच नंदुरबार जिल्हातील जितेन्द्र पाटील या दोन शिक्षकांनी न्यायाच्या प्रतिक्षेत प्राण सोडला. राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या सरकारसाठी गंभीर विषय नाही. आता पवित्र काम करणा-या शिक्षकांचा मृत्यू सुध्दा सरकारसाठी गंभीर विषय राहीला नसल्याची टिका नानाभाऊ पटोले यांनी केली आहे.

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात पगाराशिवाय काम करतांना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परीस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम पडत आहे,असे असतांनाही सरकार या विषयाकडे गंभीरतेने बघत नसल्यामुळे नानाभाऊ पटोले यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.राज्यभरातील विनाअनुदानीत शाळेंना त्वरीत अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. आठ दिवसात हा निर्णय न घेतल्यास विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांच्या सुरु असलेल्या आंदोलनात कॉग्रेसचे कार्यकर्ते उडी घेतील असा स्पष्ट इशारा नानाभाऊ पटोले यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

सरकारी कर्मचाऱ्यांना झटका; प्रॉव्हिडंट फंडाच्या (GPF) व्याजदरात कपात

पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसोबतच हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत द्यावी – काँग्रेस

दुष्काळमुक्तीसाठी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन
Loading…