तिबेटमध्ये काळ्या सफरचंदाची शेती, झाडं पूर्ण होण्यासाठी लागतो ८ वर्षांचा कालावधी

आरोग्यासाठी चांगले राहण्यासाठी आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ यांचा आवर्जुन समावेश करायला हवा.काही फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचं प्रमाण असतं. तर काही फळांमध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण असतं त्यामुळे फळे खाणं कधीही आरोग्यासाठी चांगलंच. सफरचंद हे कोणत्याही आजारपणामध्ये सहज खाता येणारं फळ आहे. त्यामुळे या फळाला मागणी देखील जास्त आहे.

जाणून घ्या ,चिकू लागवडीचे तंत्र

साधारणपणे सफरचंद म्हटलं की लालबुंद सफरचंद पटकन डोळ्यासमोर येतात. मात्र आता बाजारात केवळ लालच नाही तर हिरव्या रंगाची सफरचंदही विक्रीसाठी येतात. परंतु तुम्हाला माहित आहे काय की बाजारात काळ्या रंगाची सफरचंद देखील असतात. तिबेटमध्ये काळ्या सफरचंदाची शेती करत असून हे सफरचंद प्रचंड महाग असतात. या फळांची किंमत ५० युआन म्हणजे साधारणपणे ५०० रुपये असल्याचं सांगण्यात येतं. या सफरचंदाचं झाडं पूर्ण होण्यासाठी त्याला ८ वर्षांचा कालावधी लागतो.

जाणून घ्या बदामचे फायदे…

या काळ्या सफरचंदाची शेती तिबेटमध्ये करण्यात येत असून त्यांचा रंग पूर्णपणे वांग्याप्रमाणे काळा असतो. विशेष म्हणजे हे सफरचंद दुर्मिळ प्रकारचं आहे. त्यामुळे ते फार मोजक्या ठिकाणीच उपलब्ध होतं. तसंच त्याची चवदेखील लाल किंवा हिरव्या सफरचंदापेक्षा वेगळी असते. दुर्मिळ असलेल्या या सफरचंदाला ब्लॅक डायमंड असं म्हणत असून ते हुआ नीयु या जातीचं आहे. तिबेटच्या पठारावर त्यांची शेती करण्यात येते.