काळा चहा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे

black tea

चहा प्रेमींच्या संख्या भारतात काही कमी नाही कारण सहसा प्रत्येकजण आपापल्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपसह करणे पसंत करतात. अमृततुल्य पेय म्हणून ओळखली जाणारी चहा शरीरात ताजेपणा आणि चैतन्य आणते. बरं हे सर्व तर सामान्य चहाबद्दल झालं मात्र, कठोर आहार पाळणारे लोकं सकाळी कोरी चहा अर्थातच ब्लॅक टी घेतात. काळा चहा सामान्य चहाच्या तुलनेत आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. दररोज सकाळी काळा चहा पिल्याने शरीरसंबंधी अनेक समस्या दूर होऊ शकता. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • काळ्या चहामध्ये असलेले टॅनिन पचनासाठी खूप फायदेशीर आहे. एवढंच नाही तर ते पाचक समस्यांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. दररोज काळा चहा पिल्याने आपण पचन क्रिया सुरळीत करू शकतो.
  • चहा सेवनामुळे यात असलेल्या पॉलीफेनॉल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारणा होऊन मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो. काळा चहा पिणाऱ्यांच्या देशात काही प्रकारचे मधुमेह खूपच कमी प्रमाणात आढळतात.
  • काळा चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सीडेन्ट असतात जे शरीराच्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
  • नियमितपणे काळा चहा पिल्याने मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यास तसेच त्यातील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • योग्य प्रमाणात काळा चहा प्यायल्याने मुतखड्यापासून बचाव होऊ शकतो. ज्या स्त्रिया नियमित ब्लॅक टी घेतात त्यांच्यामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता 8 टक्के कमी असते.
  • सिगारेटमुळे उद्भवणाऱ्या फुफुस्साच्या कर्करोगावर काळा चहा वरदान ठरू शकत. नियमित काळा चहा प्यायल्यामुळे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या –