BMW Upcoming Launch | टीम महाराष्ट्र देशा: अलीकडेच बीएमडब्ल्यू (BMW) ने दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जॉयटाऊन महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये बीएमडब्ल्यू आपल्या नवीन वाहने लाँच केली आहेत. यामध्ये त्यांनी XM परफॉर्मन्स SUV, अपडेटेड आणि विद्युतीकृत M340i आणि S1000RR सुपरबाइकसह तीन नवीन BMW वाहने लाँच केली आहेत. तर दुसरीकडे कंपनी जानेवारीमध्ये नवीन कार लाँच करणार आहे. बीएमडब्ल्यू जानेवारी 2023 मध्ये पुढील गाड्या लॉन्च करणार आहे.
जानेवारीमध्ये बीएमडब्ल्यू (BMW) पुढील कार लाँच करू शकते
बीएमडब्ल्यू 7 सिरीज i7
बीएमडब्ल्यूची बीएमडब्ल्यू 7 सिरीज i7 ही कार सेडान कार असून, ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. ही कार 7 सिरीजच्या CLAR आर्किटेक्चरवर आधारित आहे. या कारमध्ये 101.9kWh बॅटरी उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये WLTP चाचणी सायकलवर 590-625km रेंज देण्यास सक्षम आहे. ही कार ट्विन इलेक्ट्रिक मोटारद्वारे xDrive 60 पॉवरट्रेन 544hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे.
बीएमडब्ल्यू X7 रिफ्रेश
बीएमडब्ल्यू X7 रिफ्रेश या कारमध्ये कंपनीने फीचर्ससोबत इंजिनमध्ये देखील काही बदल केले आहे. या कारमध्ये 380hp पॉवरसह इनलाइन सिक्स सिलेंडर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये 353hp पॉवरसह इनलाइन सिक्स सिलेंडर डिझेल इंजिन उपलब्ध आहे. हे दोन्ही इंजिन सध्याच्या मॉडेलपेक्षा अनुक्रमे 40hp आणि 87hp अधिक आहे. हे दोन्ही इंजिन 12hp आणि 200Nm इलेक्ट्रिक बूस्ट देऊ शकते.
बीएमडब्ल्यू 3 सिरीज ग्रॅन लिमो
बीएमडब्ल्यूची ही कार भारतातील एक लोकप्रिय कार आहे. कंपनी पुढच्या वर्षी या गाडीचे अपडेटेड व्हर्जन सादर करणार आहे. यामध्ये कंपनी नवीन फ्रंट लोक आणि नवीन केबिन देऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन देखील मिळू शकतो. त्याचबरोबर या नवीन गाडीचे इंटिरियर देखील अपडेट केलेले असू शकते.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्न का नाही?”; संजय राऊतांचा परखड सवाल
- Hair Care | केस गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Sanjay Raut | रोहित पवारांच्या बेळगाव दौऱ्यानंतर राऊतांचा राज्य सरकारला टोला; म्हणाले, ”इच्छा आणि हिम्मत असली की…”
- Dry Skin | हिवाळ्यामध्ये ‘या’ सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर
- Sushma Andhare | ‘पुणे बंद बेकायदेशीर’ म्हणणाऱ्या सदावर्तेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाल्या…