Breakfast Habit | नियमित नाष्टा केला नाही, तर होऊ शकतात ‘हे’ आजार

Breakfast Habit | नियमित नाष्टा केला नाही, तर होऊ शकतात 'हे' आजार

टीम महाराष्ट्र देशा: नाष्टा (Breakfast) हे दिवसभरातील सर्वात महत्त्वाचे खाणे मानले जाते. ब्रेकफास्ट या नावावरूनच कळून येते की, तुम्ही सकाळी रात्रीचा उपवास म्हणून शरीराला पोषण पुरवण्याचे काम करता. पण आज कालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोक नाष्ट्याकडे दुर्लक्ष करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? सकाळी नियमित नाष्टा केला नाही तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जाऊ शकते. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी सकाळी नियमित नाष्टा करणे गरजेचे असते. सकाळी नियमित नाष्टा न केल्याने तुम्हाला पुढील समस्यांना सामोरे जावं लागू शकतो.

टाईप 2 मधुमेह

एका संशोधनात असे आढळून आले की, तुम्ही जर नाष्टाकडे दुर्लक्ष केली तर टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता वाढू शकते. याचे प्रमाणे वर्गातील महिलांमध्ये जास्त दिसून आले आहे.

वजन वाढणे

जर तुम्ही नाष्टा नाही केला तर तुम्हाला दुपारी आणि रात्री जास्त भूक लागते. परिणामी तुम्ही जास्त फॅट, कॅलरीज आणि साखरेचे सेवन करू लागतात. त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते.

कर्करोगाचा धोका निर्माण होतो

एका ब्रिटिश संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, नाष्टा वगळल्याने तुमचे वजन वाढू शकते आणि तुम्ही लठ्ठपणाचे बळी होऊ शकतात. परिणामी वजन वाढणे म्हणजे कर्करोगाचा धोका अनेकपटीने वाढणे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी नियमित नाष्टा केला पाहिजे.

हृदय समस्या निर्माण होतात

जे लोक नियमित नाष्टा करत नाही त्यांचा रक्तदाब सामान्य पेक्षा जास्त असतो. परिणामी रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

ऊर्जा पातळी खालावते

तुम्ही जर नियमित नाष्टा करत नसाल तर तुमच्या शरीरामध्ये दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवायला लागते. शरीरात ऊर्जा कमी असेल तर आपला मूड चांगला राहत नाही आणि कुठलीही काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे दिवस आनंदात आणि व्यवस्थित जाण्यासाठी नियमित ब्रेकफास्ट केला पाहिजे.

मायग्रेन

सकाळी वेळेवर नाष्टा न केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. परिणामी रक्तदाब मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या