संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात संभाजी राजा

टीम महाराष्ट्र देशा- सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे समोर आले आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे.तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात संभाजी राजा

‘समर्थ श्री रामदास स्वामी’ हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले असून त्याचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. सर्व शिक्षा अभियानात समाविष्ट असणाऱ्या या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात संभाजी राजा

सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. असा भयंकर मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही ब्रिगेडने म्हटले आहे.