BREAKING- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; हवामान विभागाची मोठी घोषणा

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या  अंदाजानुसार यंदा पाऊस समाधानकारक होणार आहे. जून ते सप्टेंबर या काळात देशभरात पाऊस सरासरीएवढा होईल, अशी दिलासादायक बातमी आली आहे. राज्यात उन्हाचा कहर वाढला असताना पावसाची शक्यता लांबल्याने चिंता वाढली होती.  हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर तो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असू शकतो.

दक्षिण भारतात सरासरीच्या 97 टक्के पाऊस होईल. ईशान्य भारतात 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) यावर्षी उत्तर आणि पश्चिम भारतात 94 टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. मध्य भारतात यंदा मोसमी पाऊस सर्वाधिक बरसणार आहे. तिथे 100 टक्के पावसाचा अंदाज आहे.

Loading...

जून ते सप्टेंबर काळात सरासरी 96 टक्के पाऊस होईल. जुलैमध्ये पावसाचं प्रमाण साधारण किंवा कमी असेल. ऑगस्टमध्ये मात्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.  हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर तो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असू शकतो.

गेल्या काही वर्षांपासून पावसाचं गणित बिघडलं आहे. मान्सूनच्या आगमानची मागे पुढे होणारी स्थिती तसेच अपुरा आणि अनियमित पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्याचं शेतीचं व्यवस्थापन करणं अवघड जातं आहे.

दरवर्षी साधारण 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा उशीरा येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालेलं आहे. पण पुढची वाटचाल संथ गतीने होत आहे. साधारण 6 जूनला मान्सून केरळात येईल, असा अंदाज आहे. राज्यात दाखल होण्यासाठी किमान 15 ते 17 जून उजाडेल असा अंदाज आहे.