‘प्रधानमंत्री पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य’

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काँग्रेसकडूनराहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना बसपाने विरोध दर्शविला आहे. बसपाच्या एका नेत्याने असे म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून योग्य असतील. बसपाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हे विधान केल आहे.

नेमकं काय म्हणाले भदौरिया?
पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्यापेक्षा विरोधी पक्षाकडून मायावतींना योग्य समजतात. तसेच, मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा राहिल्या आहेत. राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळे मायावतींना सर्वजण प्रधानमंत्री पदाच्या उमेदावर म्हणून पाठिंबा देणार आहेत.