Budget 2019 : झीरो बजेट शेतीवर आमचा भर – सितारामन

सितारामन

दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना काय मिळणार? काय स्वस्त होणार आणि काय महाग? याकडे सर्वांचे डोळे आणि कान लागून राहिले आहेत.

  •  झीरो बजेट शेतीवर आमचा भर
  • अन्नदातांना उर्जादाता बनवण्यासाठी नवीन कार्यक्रमांची आखणी
  • एक लाख किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार
  • २०२२ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वीज आणि गॅस कनेक्शन मिळणार
  •  प्रधानमंत्री सडक योजनेत ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर
  • ग्रामीण भारतासाठी मत्स व्यवसाय अतिशय महत्वाचा
  • पुढील २ वर्षात १ कोटी ९५ लाख घरकुल बनवण्याची योजना
  • पंतप्रधान आवास योजनेद्वारे ५ वर्षात १ कोटी ५० लाख घरांची निर्मिती

महत्वाच्या बातम्या –

आनंदाची बातमी ; रेल्वेत लवकरच मेगाभरती

राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन – मुख्यमंत्री