Budget 2022 : पुढील पाच वर्षात देशात 60 लाख रोजगार उपलब्ध होणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन महत्त्वाची माहिती

निर्मला सीतारामन

नवी दिल्ली –   यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या नागरिकांचे लक्ष लागले आहे  यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. तर पुढील पाच वर्षात देशात तब्बल  60 लाख रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.



केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे की आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामध्ये पुढील पाच वर्षांमध्ये 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. शिवाय या पाच वर्षात 30 लाख कोटीचे अतिरिक्त उत्पादन निर्माण होईल अशी माहिती  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –