Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला – खासदार नवनीत राणा

नवनीत राणा

मुंबई – यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील नागरिकांचे अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या नागरिकांचे  लक्ष लागले आहे.

यात  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रिर्जव्ह बँक डिजीटल करन्सीसह ४०० वंदे भारत ट्रेन, ६० लाख नव्या नोकऱ्या अशा मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. यावर आमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, विरोधक जे बोलत आहेत त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. २ लाख ३१ हजार कोटी शेतकऱ्यांसाठी देण्यात आला आहे. मला वाटतं शेकऱ्यांसाठी हा सर्वात चांगला बजेट आहे. आवास योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आतापर्यंत घरे नाहीत त्यांच्यासाठी ४८ हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच वंदे मातरमच्या ४०० रेल्वे सुरु करण्यात आली आहे. १ लाख करोड महाराष्ट्राला दिलेल आहे. लोकं म्हणत होते की उत्तर प्रदेशात निवडणुका आल्यामुळे युपीला चांगले बजेट मिळले पण सर्व राज्यांना समान बजेट मिळाले आहे, हा एक राज्याचा बजेट नसून पूर्ण देशाला डोळ्यांसमोर ठेऊन हा बजेट सादर केला आहे

महत्वाच्या बातम्या –