नवी दिल्ली – जेव्हा अर्थसंकल्प (Budhet 2022) सादर केलं जातं तेव्हा सामान्य मध्यमवर्गीय वर्गाला तसेच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की यात आम्हाला काय फायदा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज आर्थिक संकल्प सादर केले आहे. शेतीसाठी अर्थसंकल्पात नेमकं काय मिळणार याची जोरदार चर्चा सुरू होती. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळाले, याचा आढावा घेण्यात आला आहे.
रासायनिक आणि किटकनाशकमुक्त शेती करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. नैसर्गीक शेतीसह झीरो बजेट शेतीवर (Zero Budget Farming) भर दिला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. या खरेदीपोटी हमीभावाप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात २.३७ कोटी रुपये जमा केले आहेत, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, २०२१-२०२२ च्या रब्बी हंगामात १६३ लाख शेतकऱ्यांकडून १२०८ मेट्रिक टन गहू आणि धान खरेदी करण्यात येणार, शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येणार, भारतातील गरिबी हटवण्याचे ध्येय जोमाने राबवले जाणार, ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना देणार, १०० गती शक्ती कार्गो टर्मिनस बनवण्यात येणार. शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये योजना सुरू करण्यात येणार, झिरो बजेट शेती आणि नैसर्गिक शेती, आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापन यावर भर दिला जाणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितलं आहे.
शेतकर्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, यासाठी राज्य सरकार आणि एमएसएमईच्या सहभागासाठी सर्वसमावेशक पॅकेज सादर केले जाणार, गंगा नदीच्या ५ किमी रुंद कॉरिडॉरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर लक्ष केंद्रीत करून रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येणार, सिंचन-पिण्याचे पाणी वाढवण्यावर भर देण्यात येणार.
जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील ५ मोठ्या नद्या जोडण्याचे काम करणार, देशात मोठ्या प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जातात, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Budget 2022 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा, जाणून घ्या
- Budget 2022 : अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेती क्षेत्रासाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा, जाणून घ्या
- Budget 2022 : पुढील पाच वर्षात देशात 60 लाख रोजगार उपलब्ध होणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन महत्त्वाची माहिती
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, जाणून घ्या नियमावली
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला – खासदार नवनीत राणा
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता