नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स क्षेत्रात तरुणांना रोजगार (Employment) मिळावा यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
“अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) या क्षेत्रात तरुणांना रोजगार देण्याची अफाट क्षमताआहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्माण व्हावा यासाठी सर्व भागधारकांसह एक AVGC प्रमोशन टास्क फोर्सची (AVGC Promotion Task Force) स्थापना करण्यात येणार आहे. त्यानुसार या क्षेत्रात भारतीय बाजारपेठांना आणि जागतिक मागणीसाठी देशांतर्गत क्षमता निर्माण करण्यास मदत होईल.” असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
सध्याच्या युगात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स या क्षेत्रात भविष्य बनवणारे अनेक तरुण आहेत. या तरुणांना येणाऱ्या काळात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी AVGC प्रमोशन टास्क फोर्सची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) भारताची तांत्रिक शिक्षणाची नियामक संस्था, शहरी नियोजन अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी जबाबदार असेल असेही सीतारामन यांनी म्हटले आहे. त्यामुळे रोजगारच्या दिशेने मोदी सरकारचे हे मोठे पाऊल म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, जाणून घ्या नियमावली
- थंडीचा कडाका वाढणार : पुढील 24 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येणार
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार; यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना काय मिळणार?
- PM गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधेवर भर – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची माहिती