अर्थसंकल्प : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ६,४१० कोटी रुपयांची तरतूद

artificial rain

देवेंद्र फडणवीस सरकारचा निवडणुकीपूर्वीचा अखेरचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत सादर करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमी लक्षात घेता सरकारसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा केल्या आहेत.यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ६,४१० कोटी रुपयांची तरतूद करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी शासन कटिबद्ध असून शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शासनाकडून या योजनेसाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

राज्यातील दुष्काळ लक्षात घेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे ठरणारे निर्णय आणि राज्याला गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असा अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी आज मांडला.

या अर्थसंकल्पातून बळीराजा जलसंजीवनी योजनेकरिता सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता रु. १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे. जमीन महसुलात सूट देण्यात आली असून, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिली आहे. तसेच कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम

मुनगंटीवारांच्या पेटाऱ्यातून कृषीसाठी योजनांचा पाऊस, शेतकऱ्यांवर प्रभाव पडणारा राज्य अर्थसंकल्प

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.