अर्थसंकल्प : राज्याच्या इतिहासात प्रथमच शेळी व मेंढ्यांसाठी चारा छावण्या उभारण्याचा निर्णय

शेळी व मेंढ्यां

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात मांडला जात आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.

राज्यामध्ये 1 हजार 635 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून, त्यामध्ये 11 लक्ष 4 हजार 979 पशुधन दाखल. शेळी व मेंढी यांच्यासाठी चारा छावण्या उभारण्याचा प्रथमच निर्णय घेण्यात आला आहे. चारा छावण्यातील पशुधनाच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून ते मोठया पशूंसाठी प्रतिदिन रु.70 वरुन रु.100 व छोटया पशूंसाठी रु 35 वरुन रु 50 करण्यात आले आहे.

राज्यातील दुष्काळ लक्षात घेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे ठरणारे निर्णय आणि राज्याला गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असा अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी आज मांडला.

या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे…

  • ओबीसी समाजासाठी राज्यात ३६ वसतीगृह सुरू करणार
  • राज्यात ८० तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतंर्गत फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार
  • कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यासाठी १०० कोटी उपलब्ध करणार
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी १०० कोटींची तरतूद
  • ८० टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार
  • मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता

मासे साठविण्यासाठी १० हजार शीतपेट्या उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्प : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ६,४१० कोटी रुपयांची तरतूद