अर्थसंकल्प जगाला भारताची अर्थविश्वतील झेप दाखवेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अर्थसंकल्प

नवी दिल्ली – दि. १ फेब्रुवारी २०२२ ते ८ एप्रिल २०२२ अर्थसंकल्प आहे. भारतीय अर्थसंकल्प (Budget) २०२२ आजपासून संसदेतील सेंट्रल हॉल मध्ये सुरू होणार आहे. . अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपति रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी सभागृहाला उद्देशून आपल्या भाषणाणे अधिवेशनाला औपचारीकरित्या सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी भारताने १५० कोटी लासींचा महत्वपूर्ण टप्पा पार केला, तसेच एका वर्षाच्या कालावधीच्या आत हा टप्पा गाठत भारत जगातील इतर राष्ट्रांमध्ये लसीकरणात सर्वात पुढे असल्याचे सांगितले.

अर्थसंकल्प अगोदर  संसदेबाहेर पत्रकारांसोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) हा अर्थसंकल्प जगाला भारताची अर्थविश्वतील झेप दाखवेल अशी माहिती दिली. सभागृहाला उद्देशून भाषणात त्यांनी, आजच्या जागतिक परिस्थितीत भारताकडे भरपूर संधी उपलब्ध असल्याचे संगीतले. हे अधिवेशन भारताची अर्थकारणातील प्रगती, लसीकरण (Vaccination) आणि भारतीय उत्पादनाची लस याबद्दल जगात भारताविषयी आत्मविश्वास निर्माण करेल असेही आपल्या भाषणात नमूद केले.देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मध्यावर हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा आजपासून सुरू होऊन तो ११ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. १२ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत हे अधिवेशन थांबणार असून या कालावधीत स्थायी समिति अर्थसंकल्पीय निधी वाटपांचे परीक्षण आणि अभ्यास करणार आहे.

महत्वाच्या बातम्या –