दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यातील कापसाची खरेदी करा – यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर

अमरावती – कापूस हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पिक आहे . विशेषतः  कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकास अनन्यसाधारण महत्व आहे. पण सध्या देशभरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांकडील कापूसही घरातच लॉकडाऊन झाला आहे. या कोरोना विषाणूमुळे खरेदी प्रक्रियाही कमी झाली आहे.

शरद पवारांनी केंद्राकडे साखरेकरिता पॅकेज मागितले परंतु कापसाकरिता एक शब्द ही बोलले नाही, विदर्भ- मराठवाड्याचे हेच दुर्दव

खरेदी प्रक्रियेत पूरक उपाययोजनांचे पालन करून दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यातील कापसाची खरेदी व्हावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. दर्यापूर येथील श्री साई ऍग्रो इंडस्ट्रीज या केंद्रावर सीसीआयच्या कापूस खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

पदर खोचून खुद्द खासदार नवनीत राणा उतरल्या पेरणी करायला शेतात…

यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हयात कापूस उत्पादकांची संख्या ही खूप मोठी आहे. त्यामुळे कापूस खरेदीला गती यावी तसेच कोणीही नोंदणीकृत शेतकरी हमीभावापासून वंचित राहू नये. यासाठी कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….

तसेच सद्या जिल्हयात कापूस खरेदी केंद्राची संख्या ही नऊवर आहे. आता वाहनातील कापसाची खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी व नियोजनानूसार खरेदी पूर्ण करावी, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात न्यायालयात जाणार – प्रताप अडसड

कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच ! गर्दी टाळा-शिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे