कापूस खरेदी करा, नाहीतर कापसाला आग लावून त्यामध्ये आत्मदहन करू! शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

कापूस खरेदी

बुलडाणा – कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो. कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो.

धन्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे नोंदणी केलेल्या कापसाची खरेदी न झाल्याने तो कापूस तसाच पडून आहे. तसेच शेतकऱ्यांनी आमचा कापूस खरेदी करा, अशी मागणी शासनाकडे केली होती. मोताळा तालुक्यातील शिरवा येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी टोकन देताना त्यांच्यासोबत गैरव्यवहार झाला आहे अशी तक्रार देत आरोप केला होता. त्या शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की त्यांना कापूस विक्रीपासून वंचित ठेवण्यात आले. तसेच त्यावेळी विक्री न झाल्याने कापूस घरातच पडून असल्याने उपासमारीची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश उपनिबंधकांना दिले होते पण पुढे काही त्यावर कार्यवाही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

मोठी नोकर भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी

जिल्हा उपनिबंधकांनी १५ दिवसाच्या आत चौकशी समिती नेमून अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र, अधिकाऱ्यांनी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही कोणतीही चौकशी केली नाही असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच शेतीतील उत्पन्नावर कुटुंबांची उपजिविका अवलंबून आहे. त्यामुळे कापसाची खरेदी न केल्याने कुटुंबाचे हाल होत आहेत. दरम्यान, एका आठवड्याच्या आत आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापसाला सामूहीक आग लावून त्यामध्ये आत्मदहन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात एक असंही गाव आहे; ‘या’ गावात चहा कधीच विकला जात नाही

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती