बिना पाण्याची शेती करून चौथी पास शेतकरी महिन्याला कमवतोय दीड लाख

शेती

पाण्याचा एक थेंबही न घेता महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न देणारी बाग तुम्ही कधी बघितली आहे का? हो हे खरे आहे. हा शेतकरी एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला १ लाख ६० हजार तेही पाण्याशिवाय घेत आहे. ही बाग आहे राजशेखर निंबर्गी यांची. ते कर्नाटकात विजापूर येथे राहतात.

राजशेखर निंबर्गी यांची ४५ एकरची शेती आहे. त्यातून ५२ प्रकारचे धान्य, फळे, मसाले याचे उत्पन्न निघते. कृषी तज्ज्ञसुद्धा ही शेती बघून तोंडात बोट घालतात. कारण एवढे ज्ञान फक्त एक चौथी पास शेतकऱ्याकडे आहे.

निसर्ग शेती प्रत्येकाला शक्य आहे. शेतातल्या टाकाऊ वस्तू शेतातच टाकायच्या. त्यावर अच्छादन टाकायचं त्यामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. कालांतराने त्याच टाकाऊ पासून पाणी तयार होते. हेच पाणी झाडे शोषून घेतात.

त्यामुळे वातावरणातील पाणी जमिनीत मुरते. या अच्छादनामुळे जमीन कायम ओली राहत असते. असे राजशेखर निंबर्गी यांनी सांगितले आहे. विजयपूर हा सोलापूरला लागून असलेला जिल्हा आहे. येथे कायम दुष्काळ असतो. धरणे, नाले, नद्या कोरड्या पडल्या आहेत. तरीही निंबर्गी यांची शेती यामध्ये लक्ष वेधून घेते.

दर बुधवारी आणि रविवारी निंबर्गी कुटुंबीय १० हजार लिंबाची तोडणी करतात. म्हणजे महिन्याला ८० हजार लिंबं. प्रत्येक लिंबू हे २ रुपयाला विकले जाते त्यातून त्यांना मग १ लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळते. निंबर्गी त्याला महिन्याचा पगार मानतात. त्याशिवाय रोप, विक्री, धान्य फळ यातूनही त्यांना अजून उत्पन्न मिळते.

महत्वाच्या बातम्या –