1800 कोटी रुपयांच्या शासन हमीसला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

1800 कोटी रुपयांच्या शासन हमीसला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता cotton

कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्य शासन हमीसला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून गेल्यावर्षी आणि यावर्षी किमान हमी भावाने खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत देण्यासाठी कापूस पणन महासंघाने बँक ऑफ इंडियाकडून ७.७५ टक्के या व्याजदराने घेत असलेल्या १८०० कोटीच्या कर्जाला सुद्धा  शासन हमी देण्यात येणार असून शासन हमीवर महासंघास द्यावे लागणारे हमी शुल्क देखील माफ करण्यात येणार आहे.

आता शेतकरी महिला होणार कापूस खरेदीदार

गेल्यावर्षी आणि यावर्षी कापूस पणन महासंघातर्फे कापूस खरेदीला आता सुरुवात झाली असून किमान हमी भावाने एकूण ८५ कापूस खरेदी केंद्रांमध्ये आतापर्यंत जवळपास ४८ लाख ५२ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. सध्या स्तिथीला ९४ केंद्रांवर कापूस खरेदी सुरु असून आतापर्यंत २७.०५ लक्ष क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे.सध्या दररोज अंदाजे ६० ते ८० हजार क्विंटल कापूस खरेदी होत आहे.