टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सणासुदीचा हंगाम जरी संपला असेल तरी अनेक कार (Car) उत्पादक कंपन्या आपल्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर (Discount Offer) करत आहे. यामध्ये Renault Motors आणि Tata Motors नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या कारवर मोठ्या प्रमाणात स्पेशल डिस्काउंट ऑफर करत आहे. कंपनीच्या या ऑफर ग्राहकांना कॅशबॅक, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनसच्या स्वरूपात मिळेल. ग्राहक या स्पेशल डिस्काउंट ऑफरचा 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत लाभ घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया डिस्काउंट ऑफर बद्दल :
पुढील कार (Car) वर आहे डिस्काउंट ऑफर
टाटा टियागो (Tata Tiago)
देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय कार टाटा टियागो वर मोठ्या प्रमाणात स्पेशल डिस्काउंट ऑफर देत आहे. कंपनीच्या या मॉडेल 30,000 रुपयापर्यंत बचत केली जाऊ शकते. स्पेशल डिस्काउंट ऑफर मध्ये कंपनीचे CNG व्हेरियंट देखील उपलब्ध आहे. कारवर ग्राहक 10,000 रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर मिळू शकतात. त्याचबरोबर या मॉडेलवर ग्राहक 20,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळवू शकतात.
रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)
रेनॉल्ट आपल्या या एंट्री-लेव्हल क्विड हॅशबॅक कारच्या सर्व व्हेरिएंटवर 10,000 रोख रुपयांची ऑफर देत आहे. त्याचबरोबर कंपनी या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही या कारवर 30,000 पर्यंत डिस्काउंट मिळवू शकतात. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यांना आणि शेतकऱ्यांना या कारवर 5,000 रुपयांची अधिक सूट मिळेल.
रेनॉल्ट किगर (Renault Kiger)
नोव्हेंबर महिन्यामध्ये रेनॉल्ट आपल्या या SUV वर 10,000 पर्यंत एक्सचेंज कॉर्पोरेट डिस्काउंट ऑफर करत आहे. तर या कारवर इतर कोणतीही ऑफर उपलब्ध कंपनी करत नाही. कंपनी या कारच्या खरेदीवर शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांना 5,000 रुपये ऑफर करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध का? ; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण
- iPhone 14 Price | iPhone 14 मिळत आहे 7 हजार रुपयांनी स्वस्त, कसा? ते जाणून घ्या!
- Amol Mitkari | “… म्हणून अब्दुल सत्तारांनी कुत्रा ‘ही’ निशाणी मागितली होती”, अमोल मिटकरी सत्तारांवर कडाडले
- Jitendra Awhad | “महाराजांना ब्राम्हणशाहीच्या अधीन असणारा एक मुस्लिमद्वेष्टा राजा अशा रूपात दाखवले गेले ” ; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट
- MNS । “आव्हाड हे अफझल खानाचे प्रवक्ते”; मनसेचा जोरदार हल्लाबोल