Car Update | फेस्टिव्ह सीजनमध्ये ‘या’ कार ग्राहकांना करत आहेत विशेष आकर्षित

Car Update | फेस्टिव्ह सीजनमध्ये 'या' कार ग्राहकांना करत आहेत विशेष आकर्षित

देशामध्ये सध्या सणासुदीची धूम सुरू आहे. सगळीकडे खरेदी विक्रीचा जोर वाढला आहे. आणि याच संधीचा फायदा घेत मारुती, टाटा, इत्यादि  कंपन्यांनी आपल्या नवीन कार लाँच केले आहे. आणि या नवीन कार लोकांसाठी मुख्य आकर्षण बनल्या असून मोठ्या प्रमाणावर त्यांची खरेदी सुरू आहे. फेस्टिव सीजन मध्ये तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर तुम्ही या कार नक्की खरेदी करू शकता.

Maruti Suzuki Alto K10

Maruti Suzuki Alto K10 अनेक आकर्षक फिचर्सने बनलेली आहे. यामध्ये अँड्रॉइड ऑटो, कार्ड प्ले कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिक ऍडजेस्टेबल मिरर, मॅन्युअल एअर कंडिशनर आणि पावर विंडो बटण यासारखे आकर्षक फिचर्स आहे. या कारमध्ये 1.0 लिटर k10 इंजिन आहे. जे 66 bhp मॅक्झिमम पावर आणि 89 न्यूटन मीटर पार्क प्रोड्यूस करते. यामध्ये फाय स्पीड गिअर बॉक्स असून ही कार 24.39 kmpl मायलेज देते.

Tata Tiago EV

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा ने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV बाजारात लाँच केली आहे. या कारच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 19.2kWh आणि 24kWh बॅटरी पॅक आहेत. ही कार एका चार्ज मध्ये 315 मीटरपर्यंत जाऊ शकते. हा कारची एक्स-शोरुम किंमत 8.49 रुपये आहे. ग्राहक या कारला 10 ऑक्टोबर पासून बुक करू शकतात.

Maruti Suzuki Grand Vitara

Maruti Suzuki Grand Vitara ही नवीन SUV नुकतीच लाँच झाली आहे. यामध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत, त्यामध्ये 1490 cc पेट्रोल इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड आणि 1462 cc पेट्रोल स्मार्ट हायब्रिड यांचा समावेश आहे. या कारमध्ये  5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, 6 ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. या कारच्या मायलेज बद्दल बोलायचे झाले तर, ही कार 27.97 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. ही कार 9 रंगांमध्ये उपलब्ध असून या कारची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख दरम्यान आहे.

महत्वाच्या बातम्या