‘सावधान’ पुण्यासह महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा !

महाराष्ट्र्र

पुणे – ढगाळ वातावरणानंतर आता थंडी(Cold) हळू हळू पुन्हा जोर धरताना आपल्याला दिसत आहे. हवामान विभागाने पुणे- मुंबईसह उत्तर आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागांमध्ये येत्या २४ तासांत थंडीची(Cold) लाट(Wave) येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. किमान तापमानात लक्षणीय घट होणार असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगत स्वतःची व कुटुबांची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे .

तसेच मंगळवारी दिनांक २४ रोजी पुणे शहरात हंगामातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे शहराच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गार वारे वाहत आहेत त्यामुळे सर्व भागात थंडीचा(Cold)कडाका वाढला असल्याचे चित्र आहे. कमाल आणि किमान तापमानातही सतत घसरण होत असल्याने. येणाऱ्या २४ तासात राज्यातील बहुतांश भागांत थंडीची(Cold) लाट येणार असल्याने तापमानात(In temperature) आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने( Meteorological Department) वर्तविला आहे. तसेच काल दिनांक २४ रोजी मंगळवारी नाशिक जिल्ह्यात 6.3 अंश सेल्सिअस इतक्‍या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती . तसेच पुण्यातील तापमान(Temperature) हे कमाल २६.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ८.५अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

थंडी(Cold) असल्यावर ‘हि’ घ्यावी काळजी – १) उबदार कपडे घालावे 2) बाहेरील थंड(Cold) वाऱ्यात न जाता शक्यतो घरीच राहण्याचा प्रयत्न करावा.
3) थंडीच्या(Cold) दिवसात म्हणजेच हिवाळ्यात कोमट पाणीच प्यावे. 4) आपल्या घरातील व कामाच्या ठिकाणातील परिसर कोरडा ठेवावा.

हवामानशास्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपि म्हणाले कि “उत्तर प्रदेशाच्या उत्तर पश्‍चिम भागावर पश्‍चिमी चक्रीय स्थिती कार्यरत असल्याने, २९ जानेवारीला हिमालयाच्या भागात नवीनच पश्‍चिमी चक्रावात(In a cyclone) धडकणार आहे. म्हणूनच ह्याचा तीव्र प्रभावामुळे(Due to the acute effect) महाराष्ट्र, जम्मु-काश्‍मीर, सिक्‍कीम, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली,लडाख, हिमालयीन प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान म्हणूनच या राज्यामध्ये भरपूर धुके(Fog) तसेच थंडीची खूप मोठी लाट(Wave) येणार आहे.”

महत्वाच्या बातम्या –