जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयचा छापा ; ‘नोटा’ मोजण्यासाठी मागवले ‘मशिन’!

जिल्हाधिकारी अभय सिंह

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (ता.१०) उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभय सिंह यांच्या निवासस्थानी छापा टाकला. अवैध वाळू खननप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अभय सिंह २०१२ मध्ये फतेहपूर येथे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव मुख्यमंत्री होते. या कार्यकाळात हा घोटाळा झाला होता. सिंह यांच्यावर या घोटाळ्याचे आरोप आहेत.

बुधवारी सकाळी सीबीआय अधिका-यांची एक टीम अभय सिंह यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर पोहोचली. याठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली. सुरक्षा दलाला गेटवर तैनात करण्यात आले होते. अधिका-यांनी या जिल्हाधिकारी अभय सिंह यांची दोन तास चौकशी केली. दरम्यान, अभय सिंह यांच्या निवासस्थानाची व कार्यालयाची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये ४७ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली.

महत्वाच्या बातम्या –

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणार – प्रतापराव जाधव

कर्नाटक सरकार संकटात ; ११ आमदारांचा राजीनामा

अर्थसंकल्प : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ६,४१० कोटी रुपयांची तरतूद