कोरोना विषाणूच्या संकटामुळे बैलपोळा घरातच साजरा करा

जालना: शेतकऱ्यांसाठी दिवाळी इतकाच महत्वाचा असणारा बैलपोळा सणही कोरोना विषाणूच्या संकटामुळे घरात किंवा आपल्या शेतात साजरा करावा लागणार आहे. जालना जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येमुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बैलपोळा सण सार्वजनिक पद्धतीने साजरा न करता आपल्या घरात किंवा शेत परिसरात साजरा करण्याचे आदेश दिले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मुळा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

शहरी भागप्रमाणे आता ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. जिल्ह्यातआतापर्यंत 3678 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 2293 रुग्ण बरे झाले आहेत.

तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

दरम्यान गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असताना आता बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर मेहनत घेणाऱ्या बळीराजाच्या सर्जा-राजाच्या बैलपोळ्या सणावर गंडांतर आले आहे. जिल्हाधिकारी बिनवडे यांनी बैलपोळा सण सार्वजनिक रित्या साजरा न करण्याचे आदेश जारी केले असून बैलाची मिरवणूकही न काढण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता

खरीप हंगाम पीककर्ज वाटपासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ