केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण केले नाही, त्यामुळे ३१ जानेवारी ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार – राकेश टिकैत

राकेश टिकैत

नवी दिल्ली – केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे आज ३१ जानेवारी हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. असे भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेले तीन कृषि कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक वर्षभर आंदोलन करावे लागले. त्यानंतर ते कायदे मागे घेण्यात आले. मात्र दिलेले वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे आजचा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाणार आहे.

राकेश टिकैत यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. टिकैत म्हणतात, ‘ केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास घात केल्याने आजचा ३१ जानेवारी हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाणार आहे. केंद्र सरकारने ९ जानेवारी रोजी दिलेल्या पत्रावरुन आंदोलन स्थगित करण्यात आले होते, त्यातील एकही वचन सरकारने पूर्ण केले नाही.’, असे ट्विट राकेश टिकैत यांनी केले आहे.

भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केले होते. हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी २०२० मधील नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले होते. यात तीन कृषी कायदे मागे घेण्यासह शेतमालाला एमएसपी देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने एमएसपी लागू करण्याचे वचन दिले होते. मात्र पूर्ण केले नाही, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –