केंद्र सरकारचा पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांना खुश करण्याचा ‘असा’ प्रयत्न

मोदी आणि शेतकरी

नवी दिल्ली – कृषी विधेयकांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र, या कायद्यांना अनेक ठिकाणी विरोध होत असल्यामुळे प्रत्येक राज्यात या कायद्यांच्या अंमलबजावणीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच पंजाब आणि हरियाणामध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना खूप मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या कायद्यांमुळे पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांना आधारभूत किंमत बंद होण्याची भिती वाटत आहे. तसेच शेती कार्पोरेट कंपन्यांच्या हाती जाण्याची भितीही अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे या ठिकाणी या कायद्यांना विरोध वाढत आहे.

मात्र, सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी तसेच त्यांना सरकारी खरेदी बंद होणार नाही हे सांगण्यासाठी तांदळाची खरेदी सुरु केली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये २६ सप्टेंबरपासून सरकारी खरेदीला सुरुवात झाली आहे, तर तीच खरेदी इतर ठिकाणी २८ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. सध्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये तांदळाची आधारभूत किंमतीने खरेदी सुरू आहे.

तसेच तांदळाच्या खरेदीसाठी सरकारने चालू वर्षात आधाभूत किंमत ठरवली आहे. प्रति क्विंटलला १ हजार ८६८ रूपये हा दर तर अ ग्रेडच्या तांदळासाठी १ हजार ८८८ रूपये प्रति क्विंटल असा दर निश्चित करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तसेच सरकारने आतापर्यंत ६८९.४४ कोटी रुपयांच्या तांदळाची खरेदी केली असून याचा जवळपास २८,७१५ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. त्याचप्रमाणे एका आठवड्याच्या नंतर ही सरकारी खरेदीची गती वाढणार असल्याची माहिती देखील मंत्रालयाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –