धान खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केले चक्काजाम आंदोलन

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील आधारभूत धान खरेदी केंद्र १५ दिवसांपासून बंद असल्यामुळे धान विक्री पूर्णतः ठप्प झालीआहे. धान खरेदी केंद्र सुरू करावे, या मुख्य मागणीसाठी कुरखेडा येथे शेतकऱ्यांनी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात गोठणगाव नाक्यावर कल माझेच ३० जानेवारी २०२० रोजी चक्काजाम आंदोलन केले. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल केली जात नसल्याने संस्थांचे गोदाम फुल्ल झाले आहेत.

कोरडा दुष्काळ घोषित करण्यासाठी दररोज निवेदनांचा पाऊस

त्यामुळे धान खरेदी प्रक्रिया मागील १५ दिवसांपासून बंद ठेवली आहे. अजुनही ६० टक्के शेतकऱ्यांचे धान शिल्लक आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जवळपास तीन तास वाहतूक रोखून धरण्यात आली.

कापसाचे दर ५१०० वर

तहसीलदार सोमनाथ माळी, महामंडळांचे उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे, ठाणेदार सुधाकर देढे, एपीआय समीर केदार, सहकार अधिकारी सुनील अतकरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मागण्या वरिष्ठांकडे पाठवून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.