१४ ऑगस्ट रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन

वेबटीम : शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करा या महत्वाच्या मागणी सह इतर अनेक माग्णयांसाठी मागीलकाही दिवसात शेतकरी रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे राज्य शासनाला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र, घोषणा करताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती लावल्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने या अटीमय कर्जमाफी विरोधात १४ ऑगस्टला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्य़ातील पालकमंत्री ऐवजी शेतकऱ्यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ध्वजारोहण करावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
१४ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सुकाणू समितीची बैठक मार्केट यार्ड येथे पार पडली. शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी असून पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना होणारा त्रास याबाबत आणि १४ ऑगस्टला तालुकानिहाय रास्ता रोको आंदोलन करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. सुकाणू समितीचे जिल्हा सदस्य संजय जगताप यांनी याबद्दल माहिती दिली.
शहरातील कामगार आणि नोकरदार वर्गाने आंदोलनाला पाठिंबा दिला असून पिंपरी-चिंचवड येथे कामगार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच १४ ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व महाविद्यालये बंदची हाक दिली आहे.
Loading…