चक्रधर बोरकुटे यांनी सेन्सरची केली निर्मिती

शेतीमध्ये विविध पिकांना आवश्यक असणारे पाणी हे योग्य प्रमाणात मिळावे .याकरता शेतकरी कुंटुंबातील पुण्यात राहणारे चक्रधर बोरकुटे यांनी सेन्सरची निर्मिती केली असुन शेतकरी याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

पिकांना पाणी देताना ते कधी कमी -अधिक दिले जाते .याचा परिणाम पिकांसोबत शेतजमिनीवरही होत असल्याने उत्पन्न कमी येऊन जमिनीचा पोत बिघडतो .त्यामुळे पुरक ,पोषक,पाणी आणि जमिनीतील मुलद्रव्य पिकांना देण्याकरता वायरलेस सेन्सरची निर्मिती चक्रधर बोरकुटे यांनी केली .या सेन्सरला इंटरनेट लागत नसुन रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातुन नियंत्रण ठेवता येते. एका एकरात दोन सेन्सर लावल्यानतंर याची संपुर्ण माहिती शेतक-यांना त्याच्या स्मार्ट फोनच्या माध्यमातुन मिळु शकते .सेन्सरमधुन पिकांना पाणी कधी दयावे, किती दयावे तसेच मातीमधील ओलावा किती आहे. याची इत्यंभुत माहिती सेन्सरमधुन शेतक-यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतक-यांचे पाणी देण्याचे कष्ट वाचणार असुन भरघोस पिकही मिळणार आहे . याशिवाय शेतजमीनीचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे. जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडीतील शेतकरी सुरेश गायकवाड यांच्या शेतात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याबद्दल सुरेश गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.

जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

चक्रधर बोरकुटे यांच्या या नविन सेन्सर प्रणाली नाबार्ड,लुपिन फांऊडेशन ,सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठच्या स्टार्टअप विभागाने मदत केलीआहे. येत्या काळात हे नविन तंत्र अगदी माफक दरात शेतक-यांकरता उपलब्ध असुन जास्ती जास्त शेतक-यांनी हे तंत्र आत्मसात करुन आपले शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन चक्रधर बोरकुटे यांनी केलय.

जाणून घ्या , तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

या सेन्साँऱ प्रणाली मुळे शेतक-यांचे कष्ट,कामगारांवर होणारा खर्च कमी होणार असुन शेतक-यांनी हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतीचे उत्पन्न वाढावे हाच उद्देश या उपक्रमाचा आहे .अशा स्टार्टअप ना नाबार्ड नेहमीच मदत करत असते. शेतीविषयक नविन संशोधन जर कोणी केले असल्यास त्यालाही आर्थिक सहाय्य केले जाईल असे नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक उदय क्षीरसाळकर यांनी केले आहे.पारंपारिक पध्दतीने शेतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने शेतकरी ही आता टेक्नोटसेव्ही होऊ लागला हे प्रगत शेतीचे उदाहरण म्हणावे लागेल..