चाकूर तालुक्याला अकरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त

शेतकरी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानापोटी यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, मराठी मुळाक्षरांच्या अनुक्रमाने येणाऱ्या 22 गावांतील 11 हजार 617 शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.

तालुका दरम्यान जुलै ते ऑगस्ट व सप्टेंबर ते या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. 45 हजार शेतकऱ्यांच्या शेतातील 56 हजार सातशे हेक्टरवरील जिरायती, बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.

Loading...

यातील सर्व शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी 46 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शासनाने मंजूर केलेल्या हेक्टरी आठ हजार रुपयांच्या अनुदानाप्रमाणे तालुका अकरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेले अनुदान मराठी मुळाक्षरांच्या क्रमाने येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. 84 गावांपैकी 22 गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

‘साधारण २२ गावांमध्ये  11 हजार 617 शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनाही तातडीने अनुदानाची रक्कम देण्यात यावी,अशी मागणी केली जात आहे’.

महत्वाच्या बातम्या –

उद्धव ठाकरे आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा, प्रतिहेक्टरी मिळणार अवघे ८ हजार रुपये

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

शेतकऱ्यांचे निवेदन ; हेक्टरी ३० हजार रुपये मदत देण्याची मागणी