कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

शेतकरी

नवी दिल्ली – आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी नवीन कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.  संसदेत नुकतीच पारित करण्यात आलेली कृषी विधेयकं ही भेदभाव करणारी आणि मनमानी पद्धतीनं लादल्याचं झा यांनी म्हटलं आहे.

या कायद्यामुळे शेतकरी मोठमोठ्या उद्योगपतींचे गुलाम बनतील, असं त्यांचं म्हणणं आहे.या तीन कायद्यांविरोधात यापूर्वी काँग्रेसचे केरळचे खासदार टीएन प्रथापन आणि तामिळनाडूमधील डीएमकेचे सासदार त्रिची शिवा सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

दरम्यान, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी कृषी कायद्याच्या विरोधात केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ‘शेतकऱ्यांच्या विरोधातल्या विधेयकाच्या विरोधात मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. शेतकऱ्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत असल्याचा मला अभिमान आहे.” अस त्यांनी राजीनामा देताना म्हंटल होत.

महत्वाच्या बातम्या –