राज्यात आजपासून ‘या’ ठिकाणी पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता

पावसा

मुंबई – राज्यात पुन्हा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. अवघ्या महाराष्ट्रात पावसाने मोठा जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात मागील काही आठवड्यांपासूनच पाऊस सक्रिय झाला होता. १६ जुलैपर्यंत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे

दक्षिण कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तसेच अंतर्गत भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून पावसाची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले.

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, सोमवारी संपूर्ण किनारपट्टीवर आणि कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडू शकतो. शनिवारी दिवसभरात राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.

महत्वाच्या बातम्या –

अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे

जाणून घ्या ,कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत