नांदेड – नांदेड जिल्ह्यात आजपासून ते २९ मेपर्यंत ३० ते ४० किलो मिटर वेगाने वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे, तर नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे, नांदेड जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे नागरिकांनी ही काळजी घ्यावी
वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे नागरिकांनी लँडलाइन फोनचा वापर करू नका. जिल्ह्यातील नागरिकांनी शॉवरखाली अंघोळ करू नका. नागरिकांनी कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये, शेडमध्ये आसरा घेऊ नका. नागरिकांनी उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. अशी काळजी नागरिकांनी घ्यावी.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
- आता जून महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- चांगली बातमी – सलग दहाव्या दिवशी देशातील नवीन रूग्णसंख्या ३ लाखांहून कमी