पुढील २ ते ३ तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

विजांच्या कडकडाटासह

मुंबई –   मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह (With a thunderclap) जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार (Heavy) पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्या तील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीया जिल्ह्यात पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह (With a thunderclap) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

तर मराठवाड्यातीलऔरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड या आठ जिल्ह्यांत ढील पुढील तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –