आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

हवामान

मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून उत्तरेकडे वाटचाल केली आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या साथीनं मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यावत आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –