देशातील ‘या’ राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

हवामान अंदाज

मुंबई – देशातील तामिळनाडू, पॉंडेचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येत्या 4 ते 5 दिवसांत या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह (Lightning strikes) पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहिती

हवामान (Weather)विभागाने दिलेल्या माहिती नुसार पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडणार. मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तविली आहे. तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह  गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने  वर्तविली आहे.



देशात अनेक  ठिकाणी मागील काही दिवसामध्ये या पावसाने जोरदार  लावली आहे. तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीटने  हजेरी लावली आहे. डिसेंबर महिन्यापासून देशात अनेक ठिकणी पाऊस पडत आहे, २७ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीटने हजेरी लावली होती. तर जानेवारी महिन्यातही पाऊस सुरूच आहे.

महत्वाच्या बातम्या –