राज्यात पुढील ४ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

पाऊस

पुणे – राज्यात उद्यापासून ते पुढील चार दिवस पावसाला जोरदार सुरूवात होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.  पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही  दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उद्या (दि.३१ सोमवार) मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं  हवामान विभागाने सांगितलं होते.

त्याप्रमाणे ९ ते १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल असे हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या –