पुढील ४ दिवसात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

पुणे – राज्यातील अनेक भागात पावसाने मागील आठवड्यापासून जोर धरला आहे. तर कोकणासह कोल्हापुरात मागील चार दिवस मुसळधार पाऊस सुरु असून नद्या, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी नद्यांच्या पात्राबाहेर पाणी पडले असून शेती आणि वस्त्यांमध्ये हे पाणी शिरले आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असल्याने स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

तर पुण्यात देखील मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणसाठ्यात मोठी वाढ होत आहे. तर, हवामान खात्याने बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून त्यानुसार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. आयएमडीच्या मुंबई केंद्राच्या म्हणण्यानुसार २४ तारखेपर्यंत पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तर पुढील २ दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी अति महत्त्वाचे –

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आतापर्यंत १५ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेसह सर्वच नंद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेचे पाणी ३० फुटापर्यंत पोहोचले आहे. त्यातच आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –