अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगाल उपसागराच्या परिसरात असलेल्या वाऱ्याची स्थिती मध्य भागात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे.
गुरुवारी हे क्षेत्र आणखी कमी होण्याची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. तर आज त्याची तीव्रता कमी होऊन विरुन जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे . त्यामुळे राज्यातील अनेक भागात उघडीप राहील. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर महिन्यात हीट वाढणार असून कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे. खानदेशासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याचं हवामान विभागाने संगितलं आहे. त्यामुळे या भागातून केव्हाही परतीचा मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, खानदेशातील धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान हवामान विभागाच्या मते, देशातील पाच राज्यातही मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा मध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. यासह पुढील २४ तासात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- कोरोनाची लस आल्यावर सर्वात आधी कुणाला मिळणार ?
- शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी; आता राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरणासाठी देणार अनुदान, त्यामुळे लवकर करा अर्ज
- नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करण्याचे ‘या’ मंत्रीचे निर्देश
- नोकरीच्या मागे न लागता शेतीत केला अभिनव प्रकल्प; तरूणाईसाठी प्रेरणादायी