राज्यात आज ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

राज्यातील काही भागात अंशत: ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आज ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या बारा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान काही भागात पावसाने विश्रांती दिली असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. उन्हाच्या चटक्यासह कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे.

विदर्भातील चंद्रपूर येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर पुण्यातही उन्हाचा पारा वाढत असून उकाड्यात वाढ होत असल्याची स्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंध्र प्रदेशच्या परिसरातही तयार झालेली चक्रवाताची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, विदर्भातील, अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरण राहिल. तर उद्या राज्यातील धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली लातूर, नांदेड जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊश पडेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या –